#१ & #१

#१

जुनी वर्तमानपत्र जमिनीवर पसरून
अंधूक पिवळ्या प्रकशात
मी केस कमी करते
नकोत मला केस खूप झालं वजन नको अपेक्षा
छोट्या केसांत
ना मी मुलगी ना मुलगा

(पुणे, २०२१)

#२

ही संध्या वेळ

ह्या वेळी मला इतर लोकांची

खूप गरज वाटते

ही संध्या वेळ

मला असं का वाटवून जाते?

सूर्यास्त भारतातला

हे रंग

भुरे केशरी

आंब्याच्या झाडाच्या पानांमधून

पक्ष्यांचा किलबिलाट

श्वास = विश्वास?

(गोवा, २०२२)

- सुरभी अर्जुनवाडकर

Previous
Previous

Паразит

Next
Next

Ceist na Teangan